माझ्याकडून चूक झाली असेल, तर स्वतःचा शिरच्छेद करेन, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka High Court

राज्यात अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ होत असताना न्यायाधीशांचं एक मोठं वक्तव्य समोर आलंय.

माझ्याकडून चूक झाली असेल, तर स्वतःचा शिरच्छेद करेन, न्यायाधीशांचं मोठं वक्तव्य

बंगळुरू : कर्नाटक राज्यात अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ होत असताना न्यायाधीशांचं एक मोठं वक्तव्य समोर आलंय. माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर उच्च न्यायालयासमोर उभं राहून मी माझा शिरच्छेद करण्यास तयार आहे. मी नेहमी याच भावनेनं न्यायाधीश म्हणून काम करतो, असं भावनिक वक्तव्य कर्नाटक उच्च न्यायालयाचे (Karnataka High Court) न्यायमूर्ती बी. वीरप्पा (Justice B. Veerappa) यांनी केलंय.

कर्नाटक उच्च न्यायालयातील काही वकिलांनी न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांच्या न्यायालयीन कामकाजावर प्रश्न उपस्थित करत विविध आरोप केले होते. तसंच वकिलांनी न्यायाधीशांवर नाराजी व्यक्त केल्याच्या घटना देखील अलीकडं घडल्या होत्या. याविषयी त्यांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या. सरन्यायाधीश रितू राज अवस्थी (Chief Justice Ritu Raj Awasthi) यांना निरोप देण्यासाठी अॅडव्होकेट्स असोसिएशन बंगळुरू (Advocates Association Bangalore) यांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान न्यायमूर्ती वीरप्पा वकिलांना संबोधित करत होते.

हेही वाचा: सत्तेची भूक खूपच धोकादायक; महाराष्ट्राच्या राजकारणावर सिन्हांचं परखड भाष्य

यावेळी वीरप्पा यांनी अॅडव्होकेट्स असोसिएशन बंगळुरूचे अध्यक्ष विवेक सुब्बा रेड्डी यांना अशा बिनबुडाचे आरोप करणाऱ्या बेईमान वकिलांवर कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी गुरुवारी कोर्ट हॉलमध्ये घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला, ज्याचे साक्षी रेड्डी देखील होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणं न्यायमूर्ती वीरप्पा आणि न्यायमूर्ती के. एस. हेमलेखा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाच्या कामकाजादरम्यान एका वकिलानं न्यायाधीशांशी उद्धट वर्तन केलं आणि खंडपीठाच्या अवमानाची सुनावणी सुरू असताना “मी तुमच्याविरुद्ध तीन तक्रारी केल्या आहेत” असं न्यायमूर्ती वीरप्पा यांना वारंवार सांगितलं. याकडं लक्ष वेधून घेताना न्यायमूर्ती वीरप्पा म्हणाले, बारचे काही सदस्य न्यायाधीशांवर खोटे आणि निराधार आरोप करतात, तेव्हा वकिलांच्या संघटनेला न्यायपालिकेच्या बचावासाठी पुढं यावं लागतं. न्यायाधीश काही मर्यादेपर्यंत हे आरोप सहन करू शकतात. परंतु, अशा वकिलांनी मर्यादा ओलांडल्यानंतर त्यांच्यावर सुदर्शन चक्र वापरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: एकच मंत्री करणार मोदींचं स्वागत, तर मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ पोहोचणार सिन्हांच्या स्वागताला!

Web Title: Karnataka High Court Judge Made A Big Statement About The False Allegation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnatakahigh court
go to top