कर्नाटकात हिजाब वाद चिघळला! हुबळी-धारवाडमध्ये कलम 144 लागू

Karnataka Hijab Controversy
Karnataka Hijab Controversyesakal
Summary

सध्या कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Karnataka Hijab Row : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाच्या (Karnataka Hijab Controversy) पार्श्वभूमीवर पोलिसांनी हुबळी-धारवाडात कलम 144 लागू केलंय. हा आदेश 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लागू राहणार आहे. तर, दुसरीकडं अतिरिक्त एसपी सिद्धलिंगप्पा यांनी उडुपीत कोणताही तणाव नसल्याचं सांगितलं. आम्ही उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) आदेशाचं पालन करत आहोत, असंही ते म्हणाले.

सध्या कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात हिजाबवर बंदी घालण्यावरून वाद सुरूय. इतकंच नाही तर गेल्या तीन-चार दिवसांपासून या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणीही सुरूय. मात्र, यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. या प्रकरणावर आजही कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Karnataka Hijab Controversy
Video Viral करुन वासनांध हैवानांचा गायीवर बलात्कार; 4 नराधमांना अटक

विशेष म्हणजे, हिजाबच्या वादावरून कर्नाटकात निदर्शनं तीव्र झाल्यानंतर आणि काही ठिकाणी हिंसाचार उसळल्यानंतर सरकारनं 9 फेब्रुवारीला तीन दिवस शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या होत्या. त्यानंतर त्याची मुदत 16 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. या प्रकरणी हायकोर्टानं देखील तत्काळ सुनावणीस नकार दिलाय. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं, की भाजप सरकार हिजाब वादावर उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचं पालन करेल, असं नमूद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com