
violation of current COVID-19 restrictions : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहा:कार माजवला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउन लावला आहे. मात्र, काही ठिकाणी या नियमांचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास येत आहे. कर्नाटकमध्ये कोरोना प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारनं सात जूनपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. मात्र, येथील लोकांना याचे भान नसल्याचं एका व्हायरल व्हिडिओवरुन दिसत आहे. घोड्याच्या अंत्ययात्रेला शेकडो लोकांनी गर्दी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांनी कोरोना नियमांचा फज्जा उडवला आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क यापैकी कशाचेही पालन लोकांनी केलं नाही. कर्नाटाकमधील बेलगावी जिल्ह्यातील मर्डीमठ परिसरात ही घटना घडली. व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं हा परिसर सील केला आहे. (Hundreds of people were seen at the funeral of a horse in the Maradimath area of Belagavi)
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा स्थानिक देवाला समर्पित केलेला घोडा होता. लोकांची श्रद्धा होती. लोक त्याच्या पायाही पडत होते. मर्डीमठ गावातील काडसिद्देश्वर आश्रमात असणाऱ्या या घोड्याचं शुक्रवारी रात्री वृद्धपकाळानं निधन जालं होतं. शनिवारी याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. कोरोना काळात गर्दी केल्याचा कर्नाटकातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. संपूर्ण मराडीमठ परिसराला सील केलं आहे. मराडीमठ या गावात जवळपास 400 घरं आहेत. कोन्नूर तहसीलदार प्रकाश होलेपगोळ यांनी सांगितलं की, 14 दिवसांसाठी परिसर सील करण्यात आला आहे. सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.