प्रेरणादायी : चौदा वर्षे काढली जेलमध्ये, 40व्या वर्षी बनला डॉक्टर

टीम ई-सकाळ
Saturday, 15 February 2020

कर्नाटकमध्ये कलबुर्गीमधील अफझलपुराचा रहिवासी सुभाष पाटील. वय वर्षे 40 पण, या चाळीस वर्षांत सुभाषनं खूप काही पाहिलं.

कलबुर्गी (कर्नाटक) : आयुष्यात एखादी धक्कादायक घटना घडली तर, त्यालाच धरून न बसता पुढं चालत रहायचं असतं नवी धैय्य साध्य करायचं असतं. हा सुविचार कोणीही सांगेल. पण, तो प्रत्यक्षात उतरवणारी माणसं फार कमी असतात. कर्नाटकमध्ये अशाच एका अवलियानं सगळे अडथळे पार करत डॉक्टर होऊन दाखवलंय. वाचून धक्का बसेल कारण, ती व्यक्ती एका खुनाच्या आरोपाखाली 14 वर्षे जेलमध्ये होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असा झाला सुभाषचा प्रवास
कर्नाटकमध्ये कलबुर्गीमधील अफझलपुराचा रहिवासी सुभाष पाटील. वय वर्षे 40 पण, या चाळीस वर्षांत सुभाषनं खूप काही पाहिलं. 1997ला त्यानं एमबीबीएससाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचं त्याचं धैय्य होतं. इथपर्यंत सगळं सुरूळीत सुरू होतं. पण, एका खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक झाली. 2002मध्ये हे वादळ त्याच्या आयुष्यात आलं. जेलमध्ये गेल्यानंतरही त्याची सेवाभावी वृत्ती स्वस्थ बसली नाही. त्यानं जेलच्या ओपीडीमध्ये काम सुरू केलं. त्याच्या चांगल्या वर्तनामुळं 2006मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली. सुभाषला पुन्हा आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर चार वर्षांत एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि 2019मध्ये तो डॉक्टर झाला. त्यानं एक वर्षाची एंटर्नशीपही पूर्ण केलीय आणि आता तो पूर्ण वेळ वैद्यकीय सेवेत रुजू झालाय.

आणखी वाचा - दिल्लीत विजय झाला आता आपचा डोळा....

आणखी वाचा - मुख्यमंत्री म्हणतात तुमच्या आधी मीच डिटेंशन सेंटरमध्ये असेन

भाषला 2002मध्ये खुनाच्या आरोपाखाली अटक झाली. कोर्टानं त्याला 2006मध्ये 14 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानं या शिक्षेच्या विरोधात दाद न मागण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षा भोगण्यास सुरुवात केली. सुभाषचं जेलमधील वर्तन अतिशय चांगलं होतं. त्यामुळं त्याला 2016मध्ये 15 ऑगस्ट दिवशी जेलमधून मुक्त करण्यात आलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnataka jailed for 14 years murder case become doctor at 40 subhash patil