2,348 प्रवासी गाढ झोपेत असताना रेल्वे रुळांवर कोसळले मोठे दगड; बचाव पथकं घटनास्थळी I Kannur-Bengaluru Express | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kannur-Bengaluru Express

कर्नाटकात आज (12 नोव्हेंबर 2021) पहाटे 3.50 च्या सुमारास डोंगरातून काही मोठे दगड रेल्वे रुळांवर कोसळले.

2,348 प्रवासी गाढ झोपेत असताना रेल्वे रुळांवर कोसळले मोठे दगड

बंगळुरू : कर्नाटक (Karnataka) राज्यात आज (12 नोव्हेंबर 2021) पहाटे 3.50 च्या सुमारास डोंगरातून काही मोठे दगड रेल्वे रुळांवर कोसळले. मात्र, यात कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नसला, तरी तेथून जाणाऱ्या कन्नूर-बंगळुरू एक्स्प्रेसला (Kannur-Bengaluru Express) याचा फटका बसलाय. अचानक कोसळलेल्या दगडांमुळे या एक्स्प्रेसचे 7 डबे रुळावरून खाली घसरले. बंगळुरू विभागातील टोप पुरू-शिवडी दरम्यान हा अपघात झालाय. अचानक दगड पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळ कोणालाच काही समजलं नाही. सध्या ट्रेनमधील सर्व 2,348 प्रवासी सुरक्षित आहेत.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

Kannur-Bengaluru Express

Kannur-Bengaluru Express

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ट्रेनमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असताना हा अपघात झाला. सुरुवातीला कोणालाच काही समजलं नाही. पण, काही वेळानं दगड पडल्याने ट्रेन खाली आल्याचे दिसून आले. या संदर्भात माहिती देताना दक्षिण पश्चिम रेल्वेनं सांगितलं, की ट्रेन क्रमांक 07390 कन्नूर-बंगळुरू एक्स्प्रेसला आज पहाटे अपघात झाला. ज्यामध्ये ट्रेनचे 7 डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळालीय डॉक्टरांच्या टीमसह मदत आणि बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. रेल्वे बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रवाशाला दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

रेल्वे बोर्ड : मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक

  • होसूर- 04344-222603

  • धर्मपुरी- 04342-232111

  • बंगळुरू- 080-22156554

loading image
go to top