बंगळूर : कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील कुमठा तालुक्यातील शांत व घनदाट रामतीर्थ टेकड्यांमध्ये वसलेल्या एका दुर्गम गुहेतून आध्यात्मिक प्रवृत्तीच्या रशियन महिलेला आणि तिच्या दोन लहान मुलांना वाचवण्यात (Russian Woman Rescued) आले, असे पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी (ता. १२) सांगितले.