
लक्ष्मण सावदी 2012 मध्ये कर्नाटक विधानसभा सभागृहात पॉर्न पाहताना सापडले होते आणि त्यानंतर राजीनामा दिला होता.
पराभूत होऊनही भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रिपद देत राजकीय आश्चर्य निर्माण केलं.
आता सावदी काँग्रेसमध्ये प्रवेश करून नव्या राजकीय भूमिकेत आहेत.
सभागृहात रम्मी खेळल्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या जारीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. विधानसभा सभागृहात पॉर्न पाहणारा नेता पुढं थेट राज्याचा उपमुख्यमंत्री झाला होता. कर्नाटकच्या राजकारण तेव्हा देशभरात चर्चेचा विषय बनलं होतं. भारतीय जनता पक्षाने (भाजप) लक्ष्मण सावदी यांना उपमुख्यमंत्रिपद बनवलं होतं.
विशेष म्हणजे, सावदी हे 2012 मध्ये विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहताना आढळले होते. त्यावेळी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, त्यानंतर थेट उपमुख्यमंत्रिपद देऊन भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता ते काँग्रेसमध्ये आहेत.