मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न पुढे ढकलले, माथेफिरू तरुणाच्या कृत्याने गाव हादरले

Crime News: बाल कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक येऊन अल्पवयीन मुलीचा साखरपुडा थांबवला होता.
crime
crime

बंगळुरु : मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न पुढे ढकलावे लागल्याने संतापलेल्या तरुणाने मुलीची क्रूरपणे हत्या केल्याचे घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. माथेफिरू तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्या आईवडिलांनाही बेदम मारहाण केली आणि नंतर मुलीला घराबाहेर १०० मीटरपर्यंत फरफटत नेत तिचा जीव घेतला. घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कर्नाटकच्या मधीकेरी जिल्ह्यातील सुरलब्बी गावात राहणाऱ्या प्रकाश (वय ३२) याचे १६ वर्षांच्या मुलीसोबत लग्न ठरले होते. एक दिवसांपूर्वीच मुलगी १० वीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाली होती. त्यामुळे घरातही आनंदाचे वातावरण होते. निकालानंतर आईवडिलांनी तिचा साखरपुडा करायचा निर्णय घेतला.

crime
Pune Crime News : गावाला जाताना घ्या घराची काळजी ; घरफोड्यांचे प्रमाण वाढले ,सुट्टी व लग्नसराईचा चोरटे घेतायेत फायदा

गुरुवारी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु होता, पण काहींनी बाल कल्याण विभागाला याची माहिती दिली होती. त्यानंतर बाल कल्याण विभागाचे कर्मचारी मुलीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी साखरपुडा थांबवला. अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यास पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होईल आणि सर्वांना तुरुंगात जावं लागेल असं कर्मचाऱ्यांनी समजावलं. शेवटी मुलीच्या आई-वडिलांनी साखरपुडा थांबवला. मुली आणि मुलाकडच्या कुटुंबियांनी १८ वर्षानंतरच मुलीचं लग्न लावण्याचं ठरवलं. प्रकाश आणि त्याचे कुटुंबीय तिथून माघारी परतले.

बाल कल्याण विभागाचे अधिकारी गेल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी संतापलेला प्रकाश मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीच्या आई-वडिलांना मारहाण केली. धारधार शस्त्राने आई-वडिलांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने मुलीला घराच्या बाहेर ओढत आणलं आणि तिचं डोकं उडवलं. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

crime
Dhule Crime News : पोलिसांवर दगडफेक, अश्रूधुराचा वापर; भाटपुऱ्यात युवकाच्या खुनाचे पडसाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीला पकडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी रामराजन के यांनी पीटीआयला बोलताना दिली. पीडितेच्या आई-वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये हत्या, मारहाण अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com