HD Kumaraswamy : 'जेडीएसमध्ये मतभेद नाही, आमचं लक्ष्य काँग्रेसला पराभूत करणं हेच; कुमारस्वामी यांचं विधान

HD Kumaraswamy
HD Kumaraswamyesakal

नवी दिल्ली - Karnataka BJP-JDS Alliance : कर्नाटकात भाजप-जेडी(एस) युतीबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी रविवारी जेडीएस-भाजप युतीवर मोठे वक्तव्य केले. कुमारस्वामी म्हणाले की, जागावाटपाचे प्रश्न सोडवण्यात येतील. सर्वांनाच सध्याचे काँग्रेस सरकार कसे चालतं हे ठावूक आहे. भविष्यातील काँग्रेसला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे.

HD Kumaraswamy
Shiv Sena : ''राऊतांनी सांगितलं, पेट्रोल घेऊन जा अन् मनोहर जोशींचं पूर्ण घर जाळून टाक'', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

जेडीएसमध्ये फूट पडली का? या प्रश्नाला उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले, '(जेडीएस पक्षात) कुठलीही फूट नाही, आम्ही सर्व एकत्र आहोत, आम्ही सर्व आमदारांसोबत मिळून निर्णय घेणार आहोत. काँग्रेसने आम्हाला विचारधारेबद्दल सांगू नये. त्यांची विचारधारा काय आहे? ते नितीश कुमारासोबत कसे हातमिळवणी करू शकतात. जे नितीश कुमार किती वेळा भाजपसोबत गेले आणि वेगळे झाले. काँग्रेसची हीच विचारधारा आहे का? असा सवालही कुमारस्वामी उपस्थित केला.

HD Kumaraswamy
Shiv Sena : ''राऊतांनी सांगितलं, पेट्रोल घेऊन जा अन् मनोहर जोशींचं पूर्ण घर जाळून टाक'', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

यापूर्वी शनिवारी बेंगळुरूमध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले होते की पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका भाजपसोबत लढण्याबाबत चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. कुमारस्वामी यांच्या या विधानाच्या एक दिवसआधी भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी सार्वत्रिक निवडणुका एकत्र लढवण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची कबुली दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com