बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका (Jilha-Taluka Panchayat Election) लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, भाजप (BJP) आणि धजद (JDS) हे मित्रपक्ष स्वतंत्रपणे या निवडणुका लढवण्याची तयारी करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि धजदने युती केली आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुका, ज्यामध्ये विधानसभा पोटनिवडणुकांचा समावेश होता, दोघांनीही सहयोगी पक्ष म्हणून लढवल्या.