
Karnataka Police Crime News Marathi : आपल्या जमिनीच्या वादासंदर्भातील तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या एका महिलेला भयानक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. या महिलेच्या हतबलतेचा गैरफायदा घेत एका पोलीस उपअधीक्षकानं तिला आपल्या चेंबरमध्ये बोलवून गैरकृत्य करायला भाग पाडलं, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.