बसवराज बोम्मई बनले कर्नाटकचे 30 वे मुख्यमंत्री; शपथविधी पार!

Basavaraj Bommai
Basavaraj Bommaiesakal
Updated on

बंगळूर : बसवराज बोम्मई यांना काल (मंगळवार) भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) विधानसभेचे नेते म्हणून निवडण्यात आले. यातूनच त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. याच पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज (28 जुलै, बुधवार) कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेवर आज पडदा पडला असून कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्यावर भाजपाच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून दबाव असल्याच्या अनेक चर्चा या काळात रंगल्या. मात्र, आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं येडियुरप्पांनी सोमवारी स्पष्ट केलंय. (Karnataka Political News Basavaraj Bommai Was Sworn In As The Chief Minister Of Karnataka Today bam92)

Summary

बसवराज बोम्मई यांनी आज 11 वाजता मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

बसवराज बोम्मई यांनी आज 11 वाजता मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी दरम्यान माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उपस्थित होते. या बरोबरच भाजपाचे इतर अनेक बडे केंद्रीय व राज्य ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमात उपस्थित होते. येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. 61 वर्षीय बसवराज बोम्मई यांनी आत्तापर्यंत गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आत्तापर्यंत पार पाडली आहे.

Basavaraj Bommai
'त्या हिंसाचारात पुण्याचे निंबाळकर जखमी

पिता-पुत्र मुख्यमंत्री

बसवराज बोम्मई यांचे वडील एस. आर. बोम्मई ३३ वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते. आता ३० वे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पुत्र बसवराज बोम्मई यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. देवेगौडा व कुमारस्वामी यांच्यानंतर बोम्मई पिता-पुत्रांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

Karnataka Political News Basavaraj Bommai Was Sworn In As The Chief Minister Of Karnataka Today bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com