Karnataka Politics
esakal
बंगळूर (कर्नाटक) : आपल्याला मोठे बंधू आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar यांना मुख्यमंत्रिपदी पाहायचे आहे. त्यांच्या नशिबात असेल, तर ते नक्कीच त्या पदावर पोहोचतील, असे सूचक वक्तव्य माजी काँग्रेस खासदार डी. के. सुरेश (DK Suresh) यांनी केले आहे. राज्यात मुख्यमंत्रिपद बदल आणि ‘नोव्हेंबर क्रांती’ या चर्चांना वेग आला असताना त्यांच्या वक्तव्याला मोठे महत्त्व आले आहे.