Karnataka Politics
esakal
बंगळूर : मुख्यमंत्री बदल हा राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. २१ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणार असल्याची चर्चाही जोरात आहे. मात्र, या बातमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याने सत्ताधारी काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.