Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

नवी दिल्लीः पेन ड्राईव्ह प्रकरणात अडकलेले जेडीएस खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांचे वडील एचडी रेवन्ना यांना एसआयटीने ताब्यात घेतलं आहे. बंगळूरुतल्या केआर नगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात अपहरणाची केस दाखल करण्यात आलेली होती.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांना माहिती देत सांगितलं होतं की, प्रज्ज्वल यांच्याविरोधात सीबीआय ब्लू कॉर्नर नोटीस जारी करु शकतं. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. त्यात त्यांनी प्रज्ज्वल यांना अटक करण्यासाठी तात्काळ अॅक्शन घेण्याची गरज असल्याचं म्हटल होतं.

बैठकीमध्ये एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की, रेवन्ना यांच्या अटकेसाठी योग्य ती पावलं उचलली जातील. प्रज्ज्वल हे एअरपोर्टवर पोहोचल्याची माहिती मिळताच त्यांना तात्काळ अटक केली जाईल. एसआयटीने सीबीआयकडे विनंती केली की, या प्रकरणी प्रज्ज्वल रेवन्नांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस काढावी.

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता
पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

दरम्यान, कर्नाटकमधल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीनंतर प्रज्ज्वल रेवन्ना हे २७ एप्रिल रोजी विदेशात गेले होते. त्यांच्या वकिलांनी एसआयटीच्या समोर हजर राहण्यासाठी सात दिवसांचा वेळ मागितला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com