Rice Smuggling: रेशनचा पाच लाख किलो तांदूळ जप्त, २४ ट्रकसह ४.७५ कोटींचा मुद्देमाल ताब्यात; नऊ जणांवर गुन्हे, दोन अधिकारी निलंबित

Karnataka Ration Rice Seizure, Rice Smuggling, 24 Trucks Seized या कारवाईत कर्नाटकात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ५ लाख ६४ हजार ९९२ किलो रेशनचा तांदूळ आणि २४ ट्रक जप्त करण्यात आले.
Ration Rice Smuggling Busted

Ration Rice Smuggling Busted

esakal

Updated on: 

बंगळूर : गरिबांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या रेशनच्या तांदळाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाने राज्यभरात धडक कारवाई केली. तीन दिवसांत विविध बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यांत तसेच इतर ठिकाणी केलेल्या तपासण्या व छाप्यांमध्ये पाच लाख ६४ हजार ९९२ किलो तांदूळ आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारे २४ ट्रक जप्त केले. जप्त तांदूळ व वाहनांची एकूण अंदाजित किंमत ४ कोटी ७५ लाख ९३ हजार ३३ रुपये आहे. या प्रकरणांमध्ये नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत केलेल्या या कारवाईत जप्त तांदळाची किंमत एक कोटी ३४ लाख ४३ हजार ३३ रुपये, तर वाहनांची किंमत ३ कोटी ४१ लाख ५० हजार रुपये असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com