PM Narendra Modi : हुबळीत पंजाबची पुनरावृत्ती! PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुणाने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

PM Narendra Modi : हुबळीत पंजाबची पुनरावृत्ती! PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुणाने...

हुबळी - कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे मोठे प्रकरण समोर आले आहे. येथील रोड शो दरम्यान एक तरुण पीएम मोदींच्या गाडीजवळ पोहोचला. हे पाहून सुरक्षेत तैनात असलेले एसपीडी कमांडो त्वरीत त्या तरुणाकडे सरसावले आणि पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याला पकडले. PM Narendra Modi Security news in Marathi

यावेळी कमांडोंनी तरुणाला मागे ढकलले. कारमधून उतरल्यानंतर पंतप्रधान मोदी लोकांचे अभिवादन स्वीकारत असताना ही घटना घडली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान हुबळी येथे दाखल झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याआधी वर्षभरापूर्वी पंजाबमध्ये देखील पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली होती. तेव्हा मोदींनी नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :KarnatakaBjpNarendra Modi