Karnataka Panchayat Elections
esakal
बेळगाव : राज्यातील पंचायत राज व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याच्या दिशेने राज्य सरकारने (Karnataka Panchayat Elections) पावले टाकली असून, ग्राम, तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुका एकाचवेळी घेण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. सुमारे ९० टक्के ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या दोन महिन्यांत संपत असल्याने ‘स्थानिक स्वराज संस्थासाठी-एकच निवडणूक’ या संकल्पनेतून लोकशाही प्रक्रियेला गती देण्याचा सरकारचा मानस आहे.