Karnataka voter name deletion controversy
esakal
बंगळूर : कर्नाटकातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान (एसआयआर) मतदारांची नावे वगळण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनीच तब्बल ६१ हजार ५९ ‘फॉर्म-७’ अर्ज दाखल केले (Karnataka voter name deletion controversy) आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या एकाही अर्जात नाव वगळण्याचे कारण नमूद केलेले नाही. मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी कारण देणे बंधनकारक असताना ही प्रक्रिया नियमांनुसार झाली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.