SSLC and PUC Exams
esakal
कर्नाटक सरकारने दहावी व बारावी परीक्षेसाठी उत्तीर्ण गुण ३५ वरून ३३ टक्क्यांवर आणले.
हा नियम २०२५–२६ शैक्षणिक वर्षापासून लागू होईल.
नवीन विद्यार्थी, रिपीटर आणि खासगी उमेदवारांनाही हा निकष लागू असेल.
बंगळूर : कर्नाटकातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा राबविण्यात येत असून, यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून दहावी (एसएसएलसी) आणि द्वितीय पीयुसी (बारावी) परीक्षांसाठी उत्तीर्ण (SSLC and PUC Exams) होण्याचे किमान गुण ३३ टक्के इतके निश्चित करण्यात आले आहेत. या आधी उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुण आवश्यक होते.