esakal | या राज्याने घातली तब्बल पाच राज्यांतील लाेकांना बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

या राज्याने घातली तब्बल पाच राज्यांतील लाेकांना बंदी

पुढील 15 दिवस महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि गुजरातमधून येणाऱ्या लोकांसह वाहनांना कर्नाटकात प्रतिबंधित केले आहे.

या राज्याने घातली तब्बल पाच राज्यांतील लाेकांना बंदी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटकात पुढील 15 दिवसांसाठी महाराष्ट्रासह पाच राज्यांतून येणारी देशी विमाने, रस्ते आणि रेल्वे या तीन मार्गावरील वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती कायदामंत्री मधुस्वामी यांनी गुरुवारी (ता. 28) दिली. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पुढील 15 दिवस महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि गुजरातमधून येणाऱ्या लोकांसह वाहनांना कर्नाटकात प्रतिबंधित केले आहे. या राज्यातील लोकांना कर्नाटकात कोणत्याही मार्गाने येऊ दिले जाणार नाही. गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडूसह तीन राज्यांच्या उड्डाण, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, गुजरात व अन्य काही राज्यांतून कर्नाटकात कामगार मोठ्या प्रमाणात परत येत असल्याने कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषत: उत्तर कर्नाटकात मुंबईहून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या या पाच राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंत्री माधुस्वामी यांनी सांगितले. 

कर्नाटकने यापूर्वीच सदरच्या पाच राज्यांतून येण्यास बंदी घातली आहे. त्यात आणखी 15 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, विमान व रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी या राज्यांतून येण्यास निर्बंध आहेत. विमान वाहतूकही महाराष्ट्रासह इतर राज्यांत सुरू करण्यास कर्नाटक सरकारने नकार दिला आहे. कर्नाटकात बाहेरून विशेष करून वरील पाच राज्यांतून आलेल्या लोकांमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होत असल्याने सरकारने हे पाऊल उचलल्याचेही म्हटले आहे.