Love Jihad : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची 'लव्ह जिहाद हेल्पलाईन', माहिती देणाराचं नाव गोपनिय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Love Jihad

Love Jihad : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची 'लव्ह जिहाद हेल्पलाईन', माहिती देणाराचं नाव गोपनिय

मंगळुरुः श्रद्धा मर्डर केसनंतर देशाचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालं आहे. शिवाय 'लव्ह जिहाद'चा मुद्दा या घटनेनंतर चर्चिला जात आहे.

आता लव्ह जिहाद प्रकरणाची तक्रार करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने हेल्पलाईन कर्नाटकमध्ये सुरु केली आहे. व्हीएचपीचे नेते शरण पम्पवेल यांनी सांगितलं की, दक्षिण कन्नडमध्ये कोणत्याही महिलेवर श्रद्धा वालकरसारखी परिस्थिती येऊ नये, यासाठी ही हेल्पलाईन सुरु केली आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे केले होते. ते तुकडे साठवण्यासाठी आफताबने फ्रिज खरेदी केला. त्यानंतर यथावकाश दिल्ली परिसरातल्या महरौली जंगलात ते तुकडे फेकले. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. सध्या आफताब पोलिसांच्या ताब्यात असून त्याने खुनाची कबुली दिलेली आहे. त्याची नार्को टेस्टदेखील झालीय.

श्रद्धा खून प्रकरणानंतर पुन्हा लव्ह जिहाद प्रकरण चर्चिचं जात आहे. महाराष्ट्र सरकारदेखील लव्ह जिहादविरोधी कायदा येण्याच्या बेतात आहे. दोन्ही संघटनेशी जोडलेले २० लोक या हेल्पलाईनमध्ये काम करत आहेत. कायदेशीर आणि मेडिकल इमर्जंन्सीसाठी ही हेल्पलाईन काम करणार आहे. शिवाय माहिती देणाराचं नाव गोपनिय ठेवण्यात येणार असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.

इंडिया टुडेच्या माहितीनुसार कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी सांगितलं की, बेकायदेशीरपणे कुणी सरकारच्या अपरोक्ष काम करत असेल तर पोलिस योग्य ती कारवाई करतील. त्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोणत्या राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा?

लव्ह जिहादचा कायदा उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू आहे. उत्तर प्रदेशात २०२०मध्ये पहिल्यांदा कायदा लागू झाला.

आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकरचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. या घटनेने देश हादरुन गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लव्ह जिहाद या कायद्याविषयी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात लवकरच हा कायदा येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :KarnatakajihadLover