Karni Sena announces reward for gangster Lawrence Bishnoi encounter
देश
Lawrence Bishnoi : लॉरेंस बिश्नोईचे एन्काउंटर करणाऱ्याला देणार 1,11,11,111 रुपयांचे बक्षिस, नेमकी कोणी केली घोषणा?
Karni Sena Declares Reward for Lawrence Bishnoi's Encounter : गुजरातमध्ये राहणारे शेखावत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
गेल्या काही दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान याला धमक्या देणे असो किंवा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून झालेली हत्या असो, या सर्व प्रकरणात त्याचे नाव घेतले जात आहे. यादरम्यान जर कोणी पोलिस कर्मचाऱ्याने लॉरेन्स बिश्नोईचे इन्काउंटर केले तर त्याला १ कोटी १११ लाख, ११ हजार १११ रुपयांचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा क्षत्रिय करणी सेनेकडून करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईवर गोगामेडी यांच्या हत्येचा आरोप करत क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राज शेखावत यानी ही घोषणा केली आहे.