

Government Announces Karwa Chauth Leave for Women Employees Official Order Issued for Festival Celebration and Observance
esakal
उत्तराखंड सरकारने करवा चौथच्या निमित्ताने राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निर्देशानंतर यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. महिलांना हा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करता यावा आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा सन्मान राखला जावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.