

kashi digital pind-dan ban
esakal
काशी : पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर काशीतील ऐतिहासिक पिशाच मोचन कुंडावर ऑनलाइन श्राद्ध आणि पिंडदानाची सुविधा बंद करण्यात आली आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घरी बसून श्राद्ध-विधी करण्याच्या पद्धतीला येथील तीर्थ पुरोहित आणि महंत कुटुंबाने विरोध केला आहे. पारंपरिक धार्मिक विधींमध्ये यजमानाची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
२७ सप्टेंबरपासून यंदाचा १४ दिवसांचा पितृपक्ष सुरू झाला आहे. या काळात पूर्वजांच्या स्मरणासाठी आणि पिंडदानासाठी देशभरातून सुमारे १२ लाख भाविक काशीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.