

kashi temple varanasi travel guidelines
esakal
Kashi Vishwanath Darshan Rules : तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत बाबा विश्वनाथ यांच्या नगरीत म्हणजे काशीमध्ये करण्याचे नियोजन करत असाल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाराणसीमध्ये सध्या पर्यटकांचा आणि भाविकांचा इतका मोठा ओघ वाढला आहे की, शहराच्या अरुंद गल्ल्यांपासून ते गंगेच्या घाटांपर्यंत सर्वत्र अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.