CM dr. mohan yadav
sakal
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळला भेट देणारे पर्यटक आता काश्मीरच्या डल लेकसारखा अनुभव घेऊ शकतील. ते भोपाळच्या बोट क्लबवर मोठ्या तलावातील लाटांशी खेळण्यात रमून जातील.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ४ डिसेंबर रोजी शिकारा सेवेचे लोकार्पण केले. या अंतर्गत २० शिकारे (Shikara Boats) मोठ्या तलावात (Upper Lake) उतरवण्यात आले. यामुळे आता स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांना प्रीमियम बोटिंगचा अनुभव मिळेल. तसेच, या नवीन पुढाकारामुळे राजधानी भोपाळ वॉटर-टूरिझम हब म्हणून स्थापित होईल.