
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसारन खोर्यात मंगळवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास घडलेला अतिरेकी हल्ला देशभरात खळबळ निर्माण करणारा ठरला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरची सर्वात मोठी मानली जात आहे.