
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या उन्हाळी पर्यटन जोमात सुरू आहे. दल सरोवर, मुघल बागांसह ट्युलिपच्या फुलांचे आकर्षणाने काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होत आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत पाच लाख २५ हजार २७२ पर्यटकांनी नंदनवनाला भेट दिली आहे. हिमवर्षावाबरोबरच सध्या चैत्रातील फुललेल्या काश्मीरचा अनुभव पर्यटक घेत आहे.