Sharada Bhawani Temple:'पंडितांनी उघडले शारदा भवानी मंदिर'; तीन दशकांपेक्षा जास्त काळ बंद होते काश्मीर खोऱ्यातील मंदिर
Religious Harmony: मध्य काश्मीरमधील इच्कूट गावातील या मंदिरात मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला काश्मीर खोऱ्यात दहशतवाद आणि कट्टरतावादाचे थैमान सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच काश्मिरी पंडित कुटुंबांचा एक गट त्यांच्या पूर्वजांच्या गावी परतला.
Kashmiri Pandits reopen Sharada Bhavani Temple after 30 years, marking revival of faith in Kashmir Valley.Sakal
श्रीनगर: तीन दशकांपेक्षा अधिक काळ बंद असलेले बडगाम जिल्ह्यातील शारदा भवानी मंदिर काश्मिरी पंडितांच्या समुदायाने रविवारी पुन्हा उघडले. या कार्यक्रमात स्थानिक मुस्लिम समुदायाचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.