Kedarnath Helicopter Service: केदारघाटीत हेलिकॉप्टरचा आवाज पुन्हा घुमला; केदारनाथ धामसाठी दुसऱ्या टप्प्यातील हेलीसेवा सुरू!

Kedarnath: डीजीसीएच्या सुरक्षा तपासणीनंतर केदारनाथ धामसाठी दुसऱ्या टप्प्यातील हेलीसेवा सुरू; गुप्तकाशी, फाटा आणि शेरसी येथून आठ कंपन्यांची उड्डाणे, भाविकांची मोठी गर्दी
Kedarnath Helicopter Service:

Kedarnath Helicopter Service:

sakal

Updated on

केदारनाथ : पावसाळ्यानंतर हवामानात सुधारणा होताच केदारनाथ धामच्या दुसऱ्या टप्प्यातील यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून (१५ सप्टेंबर) गुप्तकाशी, फाटा आणि शेरसी या तीन प्रमुख सेक्टरमधून आठ कंपन्यांनी उड्डाणे सुरू केली आहेत. डीजीसीएच्या सुरक्षा तपासणीनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली.

तीन सेक्टरमधून आठ कंपन्यांची सेवा

केदारनाथ खोऱ्यातील तीन प्रमुख ठिकाणांहून भाविकांची हेलिकॉप्टरने ने-आण केली जात आहे. गुप्तकाशी सेक्टरमधून ट्रान्स भारत आणि चिप्सन एव्हिएशन सेवा देत आहेत. फाटा सेक्टरमधून थम्बी हेली, राजश हेली एव्हिएशन, युनायटेड हेली आणि पिलग्रीम हेली एव्हिएशन या कंपन्या कार्यरत आहेत. तर शेरसी सेक्टरमधून हिमालय हेली आणि ॲरो एव्हिएशनच्या माध्यमातून उड्डाणे सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com