

Local youth Durga Prasad Devshali collects plastic waste at Vasuki Tal in the Himalayas
esakal
उत्तराखंड : हिमालयातील निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळांवर पर्यटकांकडून होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येचे गंभीर चित्र उत्तराखंडमधील वासुकी ताल परिसरात समोर आले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १४ हजार २०० फूट उंचीवर असलेल्या या तलावाच्या परिसरात पर्यटकांनी पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि प्लास्टिकचे रॅपर्स टाकल्याचे दिसून आले. या कचऱ्याची दखल घेत स्थानिक तरुण दुर्गा प्रसाद देवशाली यांनी स्वतः पुढाकार घेत एकट्याने स्वच्छता मोहीम राबवली.