esakal | मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
sakal

बोलून बातमी शोधा

From keeping quiet on China to mentioning Chhath The politics of PM Modi's speech decoded

मोदींच्या या संपूर्ण भाषणात चीनचा एका शब्दानेही उल्लेख नव्हता मात्र, त्यांनी छटपूजेचा उल्लेख केल्याने त्यांचा आगामी बिहार विधानसभा निवडणुकीवर डोळा असल्याचे समोर आले आहे.

मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दिल्ली : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे देशात पहिल्या लॉकडाऊननंतर सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी पाच महिने राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. मोदींच्या या संपूर्ण भाषणात चीनचा एका शब्दानेही उल्लेख नव्हता मात्र, त्यांनी छटपूजेचा उल्लेख केल्याने त्यांचा आगामी बिहार विधानसभा निवडणुकीवर डोळा असल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशातील ८० कोटी गरिबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य दिले जाईल. सध्या गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबास एक किलो डाळ दिली जाते. हे अन्नधान्य वाटप दिवाळी आणि छटपूजेपर्यंत सुरु राहील, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे, यावरून सोशल मीडियावरही उलटसुलट चर्चा चालू आहेत.

राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मोदी यांनी ही घोषणा केली. लॉकडाऊनच्या घोषणेपासून पंतप्रधानांचे हे चौथे भाषण केवळ १७ मिनिटांचे होते. केंद्र सरकारने काल टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपसह एकूण ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केले. पण, चीनने चर्चेच्या नावाखाली दगा दिला व सीमारेषेवर शस्त्रांसह सैन्याची जमवाजमव सुरुच ठेवली. यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात काहीतरी बोलती असी सर्वांना अपेक्षा होती परंतु मोदींनी आपल्या १७ मिनीटाच्या भाषणात चीनचा एका शब्दानेही उल्लेख केला नाही.

पँगाँग टीएसओ सेक्टरमध्ये फिंगर फोरपर्यंत चिनी सैन्य घुसले असून त्यांनी तिथे हेलिपॅडची सुधा उभारणी केली आहे. चीनचे हे सर्व वर्तन चिथावणी देणारे आहे. चीनच्या भूमिकेत बदल होत नसल्यामुळे अखेर भारताने काल चिनी अ‍ॅपवर बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच मोदी संध्याकाळी चार वाजता देशवासियांशी संवाद साधणार असे टि्वट करण्यात आले. त्यामुळे मोदी चीन संदर्भात काही मोठा निर्णय जाहीर करु शकतात अशी दिवसभर चर्चा होती. लष्करी पर्यायाऐवजी चिनी गुंतवणूक, आयातीसंदर्भात मोदी काही मोठे निर्णय जाहीर करतील अशी चर्चा होती. पण मोदींनी आपल्या काही मिनिटांच्या संबोधनामध्ये देशवासियांना कोरोनापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले, तर आवर्जून बिहारमध्ये महत्वाचा सण असणाऱ्या छटपूजेचा उल्लेख केल्याने त्यांचे लक्ष आगामी बिहार विधानसभा निवडणुकीकडे असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

औवेसी यांची टीका
एमआयएम पक्षाचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनी मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. पंतप्रधानांना आज चीनबद्दल बोलायचं होतं पण ते बोलले चण्यावर. एका अर्थाने हे सुद्धा गरजेचं होतं. कारण, कोणताही विचार न करता लागू केलेल्या लॉकडाउनमुळे या देशातील अनेक गरिबांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागले होते, अशा शब्दांत ओवेसींनी मोदींवर टीका केली आहे. यादरम्यान आपल्या भाषणात मोदींनी छटपूजा आणि दिवाळीचा उल्लेख केला मात्र, बकरी ईदचा उल्लेख न केल्यामुळेही ओवेसींनी मोदींवर टिकास्त्र सोडलं आहे.

loading image