Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचा विजय निश्चित झाल्यानंतर दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. 'दिल्लीवालो गजब कर दिया आप लोगो ने ! आय लव्ह यू' असे म्हणत त्यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचा विजय निश्चित झाल्यानंतर दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. 'दिल्लीवालो गजब कर दिया आप लोगो ने ! आय लव्ह यू' असे म्हणत त्यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाला तिसऱ्यांदा विराजमान होतील. दिल्लीमधील आपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि इतर नेत्यांसोबत उपस्थित होते. हा दिल्लीचा नाही तर भारतमातेचा विजय असल्याचेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्लीकरांनी आपल्या मुलावर विश्वास ठेवून त्याला तिसऱ्यांदा निवडून दिल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. स्वस्त वीज, चांगली शिक्षा मिळत असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाचा हा विजय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीकरांनी विकासाला मत देत देशाला संदेश देण्याचे काम केले आहे. दिल्लीच्या नागरिकांनी खूप विश्वासने आपल्याला विजय मिळवून दिला असून आता पुढील पाच वर्ष खूप मेहनत करायची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kejriwal at the party office says Dilli walon love you