Arvind Kejriwal : बेकायदा शिक्षा भोगण्यास तयार; केजरीवाल यांचे निवडणूक आयोगाला उत्तर
Election Commission : अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला उत्तर देताना, भाजपच्या इशाऱ्यावरून त्यांना दिली जाणारी बेकायदा शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे म्हटले. यमुना नदीत हरियाणा सरकारने विष मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.
नवी दिल्ली : ‘‘भाजपच्या इशाऱ्यावरून सुनावली जाणारी बेकायदा शिक्षा भोगण्यास मी तयार आहे,’’ असे उत्तर आम आदमी पक्षाचे(आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाला दिले.