esakal | भाजप हिंसाचार खपवून घेणार नाही; पंतप्रधान मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

थिरुप्पुर: तमिळनाडूतील एनडीएच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ धारापुरम येथे मंगळवारी आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना स्थानिक पदाधिकारी.

केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर संघटित हिंसाचाराचा आरोप करीत असा प्रकारचा कोणताही हिंसाचार भाजप खपवून घेणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा तुलना मोदी यांनी येशू ख्रिस्ताला धोका देणारा त्यांचा धर्मदूत जुडास याच्याशी केली.

भाजप हिंसाचार खपवून घेणार नाही; पंतप्रधान मोदी

sakal_logo
By
अजय कुमार

तिरुअनंतपुरम - केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर संघटित हिंसाचाराचा आरोप करीत असा प्रकारचा कोणताही हिंसाचार भाजप खपवून घेणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा तुलना मोदी यांनी येशू ख्रिस्ताला धोका देणारा त्यांचा धर्मदूत जुडास याच्याशी केली. ते म्हणाले, ‘‘जुडासने चांदीच्या किरकोळ तुकड्यांसाठी येशू ख्रिस्ताला धोका दिला. आता विजयन आणि डावी लोकशाही आघाडीही (एलडीएफ) सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळची फसवणूक करीत आहे. 

गेल्या काही वर्षांत केरळच्या राजकारणात मोठा बदल दिसत आहे. हा बदल युवकांच्या आशा-आकांक्षांशी प्रेरित आहे, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘मेट्रोमॅन’वर स्तुतिसुमने
भाजपचे पलक्कडशी जुने नाते असल्याचा उल्लेख मोदी यांनी भाषणात केला. तसेच या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ई. श्रीधरन हे केरळचे सच्चे पुत्र असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, श्रीधरन यांनी भारताला आधुनिक बनविण्यासाठी उत्कृष्ट काम केले आहे. समजातील सर्व थरांकडून गौरविलेल्या या माणसाने केरळच्या प्रगतीसाठी समर्पण केले आहे. त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन विचार केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी या विधानसभा मतदारसंघासाठी पथदर्शी अहवाल तयार केला आहे. यात २४ तास पाणी आणि अन्य काही ठोस योजनांचा समावेश आहे. मी येत्या पाच वर्षांत २५ लाख झाडे लावून हा परिसर वनाच्छादित करणार आहे. 
- ई. श्रीधरन, भाजपचे उमेदवार

Edited By - Prashant Patil

loading image
go to top