esakal | सत्तेत आलो तर केरळला ‘न्याय’ : राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) या आघाडीचे सरकार सत्तेत आले तर प्रस्तावित न्यूनतम आय योजना (न्याय) अर्थात किमान उत्पन्न हमी योजना राज्यभर लागू करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज येथील सभेत बोलताना केली.

सत्तेत आलो तर केरळला ‘न्याय’ : राहुल गांधी

sakal_logo
By
पीटीआय

कोट्टायम - केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) या आघाडीचे सरकार सत्तेत आले तर प्रस्तावित न्यूनतम आय योजना (न्याय) अर्थात किमान उत्पन्न हमी योजना राज्यभर लागू करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज येथील सभेत बोलताना केली. 

पुथुप्पली मतदारसंघात मानारकड येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. हा मतदासंघ माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील पन्नास वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजच्या सभेत राहुल यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि चंडी देखील उपस्थित होते. राज्यामध्ये न्याय योजना यशस्वी होऊ शकते याची खात्री असल्याचा विश्‍वास राहुल यांनी व्यक्त केला. ही योजना लागू करण्यात आल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी ७२ हजार रुपये जमा होतील, आम्ही नवी कल्पना येथे पडताळून पाहतो आहोत. या योजनेची संकल्पना सगळ्यापेक्षा वेगळी असून गरिबीवरील हा निर्वाणीचा हल्ला ठरेल, असा विश्‍वासही राहुल यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मतदार याद्यांमुळे विजयन टीकेचे लक्ष्य
राज्यामध्ये काही भागांत मतदार याद्यांमध्ये काही उमेदवारांच्या नावांची दोनदा ते तीनदा नोंद झाल्याचा प्रकार उघड झाल्याने विरोधकांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर टीका केली आहे. या नोंदी हेतुपुरस्सर करण्यात आल्या नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. विरोधीपक्ष नेते रमेश चेन्नीथाला यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. 

‘न्याय’मुळे थेट लोकांच्या खिशात पैसे येतील. जीएसटी, नोटाबंदीमुळे कोसळलेली अर्थव्यवस्था सावरण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
- राहुल गांधी, नेते काँग्रेस

Edited By - Prashant Patil