esakal | काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश; शरद पवार यांची पत्रकार परिषद
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar ncp

काँग्रेसला रामराम केल्यानंतर पीसी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली. यानिमित्त दिल्लीत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश; शरद पवार यांची पत्रकार परिषद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. यातच केरळमधील पी. सी. चाको यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला रामराम केला आहे. चाको हे मूळचे केरळचे आहेत. तेथील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाको यांनी, काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून पक्षाला सोड चिठ्ठी दिली होती. आज, त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली. यानिमित्त दिल्लीत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

पीसी चाको यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्यासह राष्टवादीचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीत प्रवेश करताना मला आनंद होत आहे असं चाको यांनी यावेळी म्हटलं. 

स्पेक्ट्रम चौकशी आणि पी. सी. चाको  
काँग्रेसचे केरळमधील निष्ठावंत नेते म्हणून चाको यांची ओळख होती. केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. केरळमधील विद्यार्थी चळवळीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. केरळ विधानसभेतही त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. केरळच्या उद्योग खात्याची धुरा त्यांच्याकडे होती. यूपीए-2च्या कार्यकाळातील स्पेक्ट्रम गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे ते अध्यक्ष होते. तर, काँग्रेसच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

हे वाचा - भाजपच्या प्रचारात 'गांगुली'; राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

शरद पवार यांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया
संजय राऊत यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी यावेळी फक्त चहा पाण्याची चर्चा झाली असं म्हणत प्रश्नावर उत्तर देणं टाळलं होतं. तसंच राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी इतर मोठे नेते आणि मार्गदर्शक असल्याचं म्हटलं होतं.
 

loading image