
तरुण अशा ठिकाणी अडकला होता की, त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इतर मार्ग उफलब्ध नव्हते.
तिरुवनंतरपुरम - केरळमध्ये (Kerala) पलक्कड भागातील मलमपुझा इथल्या पर्वतरांगेत धोन दिवसांपासून एक तरुण अडकला होता. त्याची भारताच्या लष्कराने (Indian Army) सुखरुप सुटका केलीय. सोमवारी तरुण अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना खाद्यपदार्थ देण्यासाठीसुद्धा त्याच्यापर्यंत जाता येत नव्हतं. अखेर कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरच्या मदतीने तरुणाला वाचवण्यात आले. (Kerala youth rescued by indian army)
तरुण अशा ठिकाणी अडकला होता की, त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इतर मार्ग उफलब्ध नव्हते. आता त्याच व्हिडिओ शेअर केला जात आहे. यामध्ये २० वर्षीय तरुण दिसत असून तो एका कड्यावर मधेच बसला होता. धोकादायक अशा ठिकाणी मदत मिळेपर्यंत तरुण घाबरलेल्या अवस्थेत होता. लष्कराच्या जवानांनी तरुणाला बाहेर काढल्यानंतर त्यांचे आभारही त्याने मानले आहेत. बाबु असं त्याचं नाव असून लष्कराच्या जवानांसोबतचा त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यात तो आभार मानत जवानांच्या गालावर किस घेताना दिसतो.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सकाळी ट्विटरवरून तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली. भारतीय लष्कराच्या जवानांनी तरुणाचा जीव वाचवला. दरम्यान, पिनराई विजयन यांनी आधी तरुणाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं होतं.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने आपल्या दोन सहकाऱ्यांसह चेराड पर्वतावर जाण्याचा प्लॅन केला होता. मात्र दोघेजण अर्ध्यातून परत आले. तर बाबुने मात्र न थांबता पर्वतावर जाण्यास सुरुवात केली. मात्र एके ठिकाणी तो घसरल्यानं मधेच अडकून बसला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.