esakal | केरळचे मुख्यमंत्री कोरोना पॉझीटीव्ह; निवडणुकीदरम्यान वाढली राज्याची रुग्णसंख्या
sakal

बोलून बातमी शोधा

pinarayi vijayan

मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी कोरोना लशीचा पहिला डोस 3 मार्च रोजी घेतला होता.

केरळचे मुख्यमंत्री कोरोना पॉझीटीव्ह; निवडणुकीदरम्यान वाढली राज्याची रुग्णसंख्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तिरुवनंतपुरम : कोरोनाचे संक्रमण अत्यंत तीव्र गतीने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना आपल्या कचाट्यात ओढू  पाहत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या दोनवेळा एक लाखाच्या पार गेली आहे. आणि आता या दरम्यानच केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे कोरोना संक्रमित झाले आहेत. याआधी विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दरम्यान विजयन यांची मुलगी कोरोना संक्रमित झाली होती. सध्या मुख्यमंत्री विजयन यांची आरोग्याची स्थिती स्थिर आहे. आणि त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये. याआधी मतदानाच्या दिवशी 6 एप्रिल रोजीच त्यांची मुलगी वीणा ही कोरोना संक्रमित झाली होती. 

मुख्यमंत्री विजयन यांनी कोरोना लशीचा पहिला डोस 3 मार्च रोजी घेतला होता. बेपोरमधून सीपीआय (एम)चे उमेदवार असणारे त्यांचे जावई देखील आज कोरोना संक्रमित आढळले आहेत. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज गुरुवारी 4,353 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यानच आज 63,901 सॅम्पल्स टेस्ट केल्या गेल्या आहेत. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधी काल बुधवारी राज्यात 3,502 नव्या केसेस समोर आल्या होत्या तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल बुधवारपर्यंत राज्यात कोरोनाचे एकूण 11,44,594 रुग्ण सापडले होते तर 4,710 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
 

loading image