
Kerala Lights the Lamp of Hope: First State to Eradicate Extreme Poverty
Sakal
तिरुअनंतपुरम : अतिदारिद्र्याच्या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी केरळमध्ये अतिगरीब निर्मूलन प्रकल्प (एक्स्ट्रीम पॉव्हर्टी इरॅडिकेशन प्रोजेक्ट अर्थात ‘ईपीईपी’) वरदान ठरला असून, त्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेले आहे. राज्यातील ६४,००६ हून अधिक अतिगरीब कुटुंबांना अखंड अन्नपुरवठा, आरोग्यसेवा, उपजीविकेचे साधन आणि सुरक्षित निवास उपलब्ध करून दिल्यानंतर केरळ आता देशातील पहिले अतिगरीबमुक्त राज्य झाले आहे. एक नोव्हेंबर रोजी केरळ राज्याच्या स्थापनादिनी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. अनेक घरांत आशेचा दीप उजळल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.