
तिरुअनंतपूरम : आठवडाआधीच मॉन्सूनने केरळमध्ये धडक दिल्यानंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे केरळमध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. रेल्वेगाड्या उशिराने धावत असून सखल भागात पाणी साचले आहे. तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. रेल्वे मार्गावर झाडे पडल्याने उत्तर जिल्ह्यातील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास विलंब लागणार आहे.