मोदींचा लस प्रमाणपत्रावरचा फोटो हटवण्याची मागणी पडली 1 लाखाला

पंतप्रधान मोदींचा फोटो लस प्रमाणपत्रावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
Narendra Modi
Narendra Modisakal
Summary

पंतप्रधान मोदींचा फोटो लस प्रमाणपत्रावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

तिरुवनंतपुरम - देशात कोरोनाविरोधात (Covid 19) लसीकरण (Vaccination) मोहिम वेगाने सुरु आहे. यामध्ये लसीकऱणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फोटोवरून वादही निर्माण झाला होता. याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावरून हटवण्यात यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसंच १ लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.

केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावली आहे. न्यायाधीशांनी सुनावणीवेळी म्हटलं की, राजकीय हेतूने प्रेरित अशी ही याचिका असल्याचं दिसतं, केवळ प्रसिद्धीच्या उद्देशाने याचिकाकर्त्याने ही मागणी केली आहे. त्यामुळे याचिका फेटाळून लावण्यात येत असून न्यायालयाचा वेळ घालवल्याबद्दल एक लाख रुपयांचां दंडही करण्यात येत आहे. दंडाची रक्कम ६ आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Narendra Modi
KMC Election Results : पश्चिम बंगालात ममतांच्या TMC ची जोरदार मुसंडी

याचिका दाखल करणारी व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक असून एक आरटीआय कार्यकर्ता आहे. त्यांनी कोरोनाची लस खासगी रुग्णालयात घेतली. त्यानंतर मिळालेल्या सर्टीफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि एक संदेशही होता. मौलिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं म्हणत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com