
Kerala High Court Verdict : केरळ उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना एका 'ट्रान्सजेंडर' जोडप्याच्या (Transgender Parents) मुलासाठी जन्म प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलंय की, मुलाचे पालक आई किंवा वडील या ऐवजी केवळ 'पालक' म्हणून ओळखले जावेत. न्यायमूर्ती जियाद रहमान ए. ए. यांनी ट्रान्स पुरुष जहाद आणि ट्रान्स महिला जिया पावल यांच्या याचिकेवर हा ऐतिहासिक आदेश दिला आहे.