
Supreme-Court : कन्नूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हिंसक हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संशयित अत्यंत धोकादायक भटक्या कुत्र्यांचा मानवी रीतीने मृत्यू व्हावा यासाठी कन्नूरच्या जिल्हा पंचायतीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
कुत्र्यांच्या मानवी रीतीने इच्छामरणासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मानवांनी इच्छामरणाची मागणी केल्यानंतर ज्याप्रकारे त्रासाशिवाय मृत्यू देण्यात येतो. तसे या कुत्र्यांना ठार करण्याची मागणी करण्यात आली आली आहे.
11 जून 2023 रोजी कन्नूरमध्ये एका 11 वर्षाच्या ऑटिस्टिक मुलाचा भटक्या कुत्र्यांनी बळी घेतला होता आणि गेल्या वर्षी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती, जिथे एक 12 वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात त्याचाही मृत्यू झाला होता. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या आहेत, असे अर्जात म्हटले आहे. (Kerala Local Body Moves Supreme Court Seeking To Euthanise Rabid Dogs)
कन्नूर जिल्ह्यातच 2019 मध्ये 5794 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची नोंद झाली आहे, 2020 मध्ये 3951 प्रकरणे, 2021 मध्ये 7927 प्रकरणे, 2022 मध्ये 11776 प्रकरणे आणि 19 जून 2023 पर्यंत 6276 प्रकरणांची नोंद आहे. या भागात सुमारे 28,000 भटके कुत्रे आहेत.
या भटक्या कुत्र्यांमुळे नाहक त्रास होत आहे. या कुत्र्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही जिल्हा पंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचे हल्ले, कुत्र्यांच्या धडकेमुळे रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, असे पंचायतीने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. (ताज्या मराठी बातम्या वाचा)
भटक्या कुत्र्यांनी 65 बदके आणि मोठ्या संख्येने पाळीव जनावरे ठार झाल्याचा दावाही अर्जात करण्यात आला आहे.पंचायतीने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की या आक्रमक भटक्या कुत्र्यांना मानवी रीतीने इच्छामरणाचे निर्देश द्यावेत. हा अर्ज अॅडव्होकेट बिजू पी रमण यांच्यामार्फत दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.