
कोरोनाच्या (Corona virus) वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी भारतातील (India) अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान, नागरिकांकडून लॉकडाऊनच्या निर्बंधांचे उल्लंघनही केलं जात आहे.
कोझिकोड - कोरोनाच्या (Corona virus) वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी भारतातील (India) अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान, नागरिकांकडून लॉकडाऊनच्या निर्बंधांचे उल्लंघनही केलं जात आहे. पत्नी आणि मुलांपासून दूर राहिल्यानं एक व्यक्ती त्रासली होती. त्यानंतर पत्नीसह मुलांकडे जाण्यासाठी त्यानं बसच चोरली. केरळमध्ये (Kerala) ही घटना घडली आहे. राज्यात लॉकडाऊन असतानाही त्यानं बसमधून चार जिल्ह्यातून प्रवास केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला कुठेही पोलिसांनी अडवलं नाही. शेवटी कुमाराकोम (Kumarakom) इथं पोलिसांना चुकवण्यात त्याला अपयश आलं आणि पोलिसांनी पकडलं. (kerala lockdown person want to meet wife and children theft bus)
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव दिनूप असं आहे. दिनूपने कोझीकोड बस स्टँडवर उभा असलेली प्रायव्हेट कंपनीची बस शनिवारी रात्री चोरली. त्यानंतर रात्रभर त्याने प्रवास केला. मात्र रविवारी सकाळी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दिनूपने अटकेनंतर पोलिसांना सांगितले की, तो पथानामथिट्टा जिल्ह्यातील तिरुवल्ला इथं पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी जात होता. दिनूपने असंही सांगितलं की, 270 किलोमीटर दूर अंतरावरं असलेल्या पत्नी आणि मुलांना भेटण्याची इच्छा होती. मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य नव्हतं आणि जाण्यासाठी वाहनसुद्धा नव्हतं.
पत्नी आणि मुलांना भेटायला जाण्यासाठी दिनूप धडपड करत होता. त्याचवेळी त्याला बस स्टँडवर एक बस उभा असलेली दिसली. दिनूपने बस सुरु केल्यानंतर त्यात इंधन फुल्ल असल्याचं दिसलं. दिनूपने त्यानंतर तिरुवल्लाकडे प्रवास सुरु केला. दिनूप मलाप्पुरम, त्रिसूर, एर्नाकुलम जिल्ह्यातून कोट्टायम जिल्ह्यात पोहोचला होता. त्याला कुमाराकोम पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.
त्याआधी दोन तीन ठिकाणी त्याला पोलिसांनी रोखलं होतं. तेव्हा पोलिसांना त्यानं आपण प्रवासी मजुरांना आणायला जातोय असं सांगितलं. लायसन मागितल्यावर तो पोलिसांना खोटं सांगत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी बसच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून बसच्या मालकाचा संपर्क शोधण्यात आला. त्यानंतर बस मालकाने त्याची बस कोझिकोडमध्ये असल्याचं सांगितलं. पोलिसांनी मालकाला जेव्हा बस कुठे आहे हे सांगितलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. दिनूपला अटक केल्यानंतर पोलिसांनी बस कोझिकोडला पाठवून दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.