Nun Rape Case : माजी बिशप फ्रँको यांची निर्दोष मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Franco Mulakkal

केरळमधील नन बलात्कार प्रकरणातून माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

नन बलात्कार प्रकरणातून बिशपची निर्दोष मुक्तता

कोट्टायाम - केरळमधील नन बलात्कार प्रकरणातून माजी बिशप फ्रँको मुलक्कल (Franco Mulakkal) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा सत्र न्यायायात या प्रकरणावर सुनावणी झाले. न्यायाधीश जी गोपाकुमार यांनी बिशप यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं.

२०१८ मध्ये २८ जून रोजी एका ननने पोलिसात बलात्कार प्रकरणी जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्याविरोधात तक्रार केली होती. या प्रकरणी न्यायालयाने ८३ साक्षीदार आणि ३० हून अधिक पुरावे तपासले. बिशप फ्रँको यांना २१ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. तर या प्रकरणी एप्रिल २०१९ मध्ये आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र अटकेनंतर ४० दिवसातच फ्रँको यांना जामीन मिळाला होता.

केरळमध्ये या प्रकऱणी फ्रँको यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. तसंच ८० पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. याशिवाय पुरावे म्हणून लॅपटॉप, मोबाइल फोन आणि मेडिकल टेस्टही देण्यात आल्या होत्या. आरोपपत्रात कॅथलिक चर्चचे कार्डिनल, मार जॉर्ज एलनचेरी, तीन बिशप, ११ पुजारी आणि २२ नन यांची नावे आहेत. फ्रँको यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी केरळ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र दोन्ही न्यायालयात त्यांनी मागणी फेटाळून लावण्यात आली होती.

हेही वाचा: कोरोनावर प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मान्यता

पीडीत ननने आरोप करताना फ्रँकोने २०१४ मध्ये हिमाचल प्रदेशातील गेस्ट हाउसमध्ये लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं होतं. तसंच फ्रँको यांनी २ वर्षात १४ वेळा बलात्कार केला असा आरोपही केला होता. पीडितेचा तीन वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं होतं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kerala
loading image
go to top