

After Karnataka, Kerala Begins Ethanol Content Checks at Petrol Pumps in Four Districts
esakal
कर्नाटकमध्ये पेट्रोलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल मिसळल्याचा आरोप झाल्यानंतर आता केरळ सरकारनेही पेट्रोल पंपांची तपासणी सुरू केली आहे. राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जात आहे. पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास संबंधित पेट्रोल पंपांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा केरळ सरकारने दिला आहे.