शारीरिक संबंधासाठी जोडीदाराची अदलाबदली, मोठ्या रॅकेटचा भंडाफोड

sex racket of partner swapping
sex racket of partner swapping e sakal
Updated on

तिरुवनंतरपुरम : शारीरिक संबंधासाठी जोडीदाराची अदलाबदली करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या रॅकेटशी (Sex Racket) संबंधित सात जणांना अटक केली आहे. केरळ पोलिसांनी (Kerala Police) रविवारी सायंकाळी ही कारवाई केली असून यामध्ये तब्बल एक हजार जोडप्यांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामध्ये उच्चभ्रू वर्गातील लोकांचा देखील सहभागी आहे.

sex racket of partner swapping
नागपूर : पॉश पार्लरमधील ‘सेक्स रॅकेट’वर छापा

एका महिलेला तिचा पती इतर पुरुषांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भागत पाडत होता. त्यामुळे तिने करुकाचल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असून करुकाचल भागात अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीला अटक केली. त्याची चौकशी केली असता या रॅकेटचा भंडाफोड झाला.

सोशल मीडियावरून एकमेकांच्या संपर्कात -

सेक्सरॅकेटमध्ये एक गट सक्रीय असून ते सोशल मीडियाचा वापर करून हा धंदा करत असल्याचे उघडकीस आले. या ग्रुपने सोशल नेटवर्कींग साइट्सचा वापर करून राज्यभरात जाळे पसरवले आहे. सुरुवातीला ते टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील होतात. अशा प्रकारे ते एकमेकांशी जोडले जातात. यामागे एका मोठ्या ग्रुपचा हात असून याप्रकरणाशी संबंधित लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असं पोलिस अधिकारी श्रीकुमार यांनी सांगितले.

उच्चभ्रू वर्गातील लोकांचा समावेश -

राज्यभरातील उच्चभ्रू वर्गातील लोक या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. सध्या 25 जण पोलिसांच्या रडारवर असून येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेले सर्व आरोपी आरोपी अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील आहेत. या रॅकेटच्या सोशल मीडिया ग्रुप्समध्ये 1,000 हून अधिक सदस्य असल्याचा संशय पोलिसांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com