esakal | कोरोनाबाबत जनजागृतीचा हटके प्रकार; केरळ पोलिसांचा VIDEO व्हायरल

बोलून बातमी शोधा

कोरोनाबाबत जनजागृतीचा हटके प्रकार; केरळ पोलिसांचा VIDEO व्हायरल
कोरोनाबाबत जनजागृतीचा हटके प्रकार; केरळ पोलिसांचा VIDEO व्हायरल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिरुवअनंतपुरम : सध्या वाढत्या कोरोनामुळे लोकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच ठिकाणी प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे लोकांकडून उल्लंघन होत आहे. यावर उपाय म्हणून पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना शिक्षा केली जात असुन काही ठिकाणी खाक्याही दाखवला जात आहे. जोर-बैठका मारणे, ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेणे, गाडी जप्त करणे असे अनेक प्रकार वाचायला, पहायला मिळत आहेत.

एका बाजूला हे घडत असताना केरळमध्ये पोलिसांनी कोवीडच्या नियमांसाठी मात्र अनोखी जागरुकता केली आहे. यासाठी त्यांनी एक पर्याय शोधून काढला. केरळ पोलिसांनी एका तमिळ गाण्यावर भर रस्त्यात रात्री डान्स केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये 9 पोलिस ऑफिसर युनिफॉर्ममध्ये डान्स करताना दिसतात. नुकतेच नवीन आलेले एन्जॉय एनजामी या तमीळ गाण्यावर हे पोलिस ऑफिसर थिरकताना दिसतात. दीड मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये कोरोनापासुन जागृत करणारे संदेश सांगितले आहेत. जसं की, नियमित मास्क घाला, सोशल डिस्टंन्स ठेवा. सॅनिटायझरने हात स्वच्छ करा अशा संदेशमय गाण्यावर ऑफिसरनी ठेका धरला आहे.

हेही वाचा: असं कुठं असतंय व्हय...ओळख झाल्यानंतर म्हणाला आता लग्नच कर...! 

सोबतच या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने लस घेतली पाहिजे, लसीकरण महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. पहिल्यांदाच केरळ पोलिसांनी असा प्रबोधनात्मक व्हिडीओ व्हायरल केला आहे. याआधीही 2020 मध्ये सुद्धा केरळ पोलिसांच्या हॅंडवॉश संदर्भातील डान्सच्या व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळीही पोलिस अधिकाऱ्यांनी व्हिडीओद्वारो हात स्वच्छ धुवा, कोरोनापासून बचाव करा असे प्रबोधन केले आहे.

केरळ राज्य सरकारच्या राज्य पोलिस मीडिया सेंटरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत 15000 शेअर्स, 42000 लाईक आणि 17000 कमेंट मिळाल्या आहेत. तसेच्या व्हिडिओसोबत 'हमें महामारी से मिलकर लड़ना चाहिए' असे कॅप्शनही दिले आहे.